0
मुंबई, १० ऑक्टोबर -: पेट्रोल आणि डिझेलवरील राज्यातील कर कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे राज्यात पेट्रोल दोन रुपयांनी तर डिझेल एका रुपयाने स्वस्त होईल अशी माहिती मुनगंटीवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले होते. यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

 
Top