Breaking News

पश्‍चिम बंगालमधून आलेल्या मुलींना देहविक्रयाला लावणारे जेरबंद

बीड, दि. 04, ऑक्टोबर - पश्‍चिम बंगालहून कल्याण येथे कामासाठी आलेेल्या मुलींना फसवून त्यांना बीड येथे देहविक्रयाच्या कामासाठी विकणार्या मामा भाच्याला  पोलिसांनी जेरबंद केले असून त्यामधून धक्कादायक असे मोठे रॅकेट उघड झाले आहे. या प्रकरणात तजुमल शेख व त्याचा मामा युनूस शेख यांनी मिळून तब्बल  पन्नास पेक्षा जास्त मुलींचा सौदा केला असावा असा पोलिसांचा संशय आहे. पन्नासपेक्षा जास्त मुलींचे फोटो या दोघांकडून पोलिसांनी हस्तगत केले असून हे फोटो  यांनी वॉटसअ‍ॅपवरून अनेकांना पाठविल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.