Breaking News

शहरात दहा ठिकाणी फटाके विक्रीसाठी तात्पुरते परवाने

सोलापूर, दि. 13, ऑक्टोबर - सोलापुरात पंधरा दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात यंदा दहा ठिकाणी फटाके विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. कायमस्वरूपी फटाके विक्रीची  शहरात असलेली 21 परवाने मागील वर्षीच उच्च न्यायालयाचे निर्देश शासनाच्या आदेशाने पोलिस आयुक्तालयाने रद्द केले होते. नागरी सुरक्षा लक्षात घेऊन यंदा होम मैदान, सावरकर  मैदान, आसरा चौक मैदान, संभाजी तलाव शेजारी, पुंजाल मैदान, चार पुतळा मागे मैदान, डब्ल्यूआयटी कॉलेजवळील चिल्ड्रन पार्क, महालक्ष्मी मंदिराजवळील मैदान या ठिकाणी  तात्पुरते स्वरूपातील फटाके विक्री परवाने दिले आहेत. तात्पुरता फटाका विक्री परवान्यासाठी पोलिसांकडे अर्ज करावा लागतो. त्यासाठी तीन महिने कालावधी लागतो. संपूर्ण चौक शी करून पोलिस आयुक्ताकडून परवाना दिला जातो. मागील वर्षी दिवाळीत पंधरा दिवसांसाठी 187 जणांनी परवानगी घेतली होती. यंदाही त्याच संख्येत विक्रेते आहेत, अशी मा हिती पोलिस उपायुक्त अपर्णा गीते सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शेख यांनी दिली. उच्चन्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणीवर नागरी वस्तीमध्ये फटाके विक्रीस बंदी  घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील नागरी वस्तीमध्ये विक्री करणारे 182 कायमस्वरूपी परवान्यांचे नूतनीकरण केले नाही. फटाके विक्री करायची असेल तर  तहसीलदार पोलिसांनी निवड केलेल्या जागेवर फटाक्यांची विक्री करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयांकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरी वस्तीतील दुकानांतून  फटाक्यांची विक्री करता येणार नाही. तात्पुरते परवाने घेऊन मोकळ्या मैदानात फटाक्यांची विक्री करावी लागणार आहे. जिल्ह्यात कायमस्वरूपी फटाके विक्रीचे 182 परवाने आहेत.  या सर्वांची सप्टेंबर 2017 मध्येच मुदत संपल्याने नूतनीकरणासाठी अर्ज केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परवानाधारकांना नागरी वस्तीमध्ये विक्री करता येणार नाही.  निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी कायमस्वरूपी परवानाधारकांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. विनापरवाना नागरी वस्तीमध्ये फटाक्यांची  विक्री केल्यास फटाके जप्त करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे श्री. रेळेकर यांनी सांगितले.