0
त्र्यंबकेश्‍वर, दि. 08, ऑक्टोबर - परतीच्या पावसाने जिल्हाद्ररूप धारण केले आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्‍वर परिसरात पावसाची तीव्रता नेहमीप्रमाणे जास्त होती. दोन  दिवसांपासून या परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. काल विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरु होता.
यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास महादू शंकर गावित (वय 30) या युवकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. हरसूल गावानजीक असलेल्या  चिंचओहळ बाभळीचा माळ येथे घटना घडली.
हरसूल पोलीस ठाण्यात पोलीस पाटील हिरामण पवार यांनी दिली. दरम्यान, त्र्यंबक तहसील कार्यलयात नायब तहसीलदार मोहन कनोजे यांच्याकडून मृताच्या  वारसाला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

 
Top