Breaking News

मुक्ताईनगरला काँग्रेसचे तहसिलसमोर विविध मागण्यांसाठी धरणे

जळगाव, दि, 12, ऑक्टोबर - मुक्ताईनगरला शेतक-यांची सरसकट कर्जमाफी दिवाळीपूर्वी करण्यात यावी. भारनियमन बंद करण्यात यावे. सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये दिवाळीपूर्वी  साखर, गहू, तांदूळ, तेल या सारखे आवश्यक धान्य उपलब्ध करुन द्यावे. या मागण्यांसाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार यांच्या दालनासमोर घोषणा देऊनधरणे आंदोलन  करण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे नायब तहसीलदार शांताराम चौधरी यांना देण्यात आले .
आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव, लक्ष्मणसिंग राजपूत यांनी केले.
यावेळी अ‍ॅड. अरविंद गोसावी, प्रभाकर चौधरी, रवींद्र दिगंबर महाजन, बाळासाहेब पाटील, नामदेव मिठाराम भोई, बी.डी.गवई, कासम ठेकेदार, बाळू कांडेलकर, सुनील भंगाळे, संजय  पाटील, डॉ. विष्णू रोटे, प्रकाश पाटील, पूना इंगळे, शकील आझाद, रवींद्र दांडगे, गणेश सोनवणे, शांताराम कंडेलकर, सदाशिव लष्करे, अतुल जावरे, संभाजी पारधी, नीलेश पाटील, कि सन चव्हाण, आलमशहा अहमदशहा, गोपाळ सिंग राजपूत, नामदेव चोपडे, रवींद्र गरुड, विनोद गरुड, भाऊलाल पाटील, साहेबराव पाटील, वैभव पाटील,समाधान भोलाने, संतोष पाटील  या प्रमुख पदाधिका-यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.