Breaking News

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख यांचा अर्ज दाखल

औरंगाबाद, दि, 12, ऑक्टोबर - निवृत्त सनदी अधिकारी व साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी औरंगाबाद येथे मराठवाडा  साहित्य परिषदेच्या सभागृहात अर्ज दाखल केला असल्याचे सांगितले. गंगाधर पानतावणे हे त्यांचे सूचक असून, डॉ. छाया महाजन, डॉ. ऋषिकेश कांबळे, अनुमोदक आहेत. लक्ष्मीकांत  देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम या गावचे आहेत.