Breaking News

शाहरुखला मुंबई पालिकेचा दणका

मुंबई, दि. 06, ऑक्टोबर - सुपरस्टार शाहरुख खान याला मुंबई महापालिकेने दणका दिला आहे. गोरेगाव पश्‍चिम परिसरातील शाहरुखच्या रेड चिलीजच्या ऑफिसवर महापालिकेने कारवाई केली आहे.
शाहरुखच्या रेड चिलीज दोन हजार चौरफ फूट जागेवरील अनधिकृत बांधकाम महापालिकेने पाडलं. महापालिकेच्या पी दक्षिण विभागाने ही धडक कारावई केली.  डीएलएच पार्क या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने कारवाई केलेल्या भागात अतिक्रमण करुण अंतर्गत  स्वरुपातील उपहारगृह चालवलं जात होतं.