Breaking News

जीएसटीमुळे सरकारने सामान्य माणसाचा पैसा ओरबडून घेतला - उध्दव ठाकरे

नांदेड, दि. 09, ऑक्टोबर - जीएसटीमुळे मोदी सरकारने सामान्य माणसाचा पैसा ओरबडून घेतला असून लोडशेडींगचा उल्लेख करून यांच्या विकासाचा मार्ग  अंधारातून जातो , विकासासोबत प्रकाशही गायब अशी टीका शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांनी केलीे नांदेड महानगरपालिका निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या  प्रचारासाठी त्यांची आज सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप सरकारवर टीका केली त्याच बरोबर भाजप बरोबर गेलेले शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर यांचाही  समाचार घेतला .जगात बेंडूक संपले तरी नांदेड मधे इकडून तिकडे उडया मारणारे बेडूक शिल्लक आहेत असे ते म्हणाले. नांदेडकरांनो वाघांना मत द्यायचे की  बेडकांना हे तुम्ही ठरवा.हिम्मत असेल तर राजीनामा दया असे अवाहनही त्यांनी चिखलीकरांना केले.मोदी यांनी आता दिवाळी सुरू झाल्याचा उल्लेख केला यांना  दिवाळी कुठं दिसली असा सवाल त्यांनी केला. शेतकर्यांची कर्जमाफी ऑनलाइनमध्येच अडकली आहे.असे ते म्हणाले कॉग्रेस व राष्ट्रवादुवर टीका करताना राज्यातील  सरकारला वाचवणारे हात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सदस्यांचे असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.