Breaking News

पीक फवारणी विषयी कृषिसेवा चालकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर - पीक संरक्षणासाठी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना अयोग्य पद्धतीचा अवलंब केल्याने अनेक शेतकर्‍यांना विषबाधा होण्याच्या घटना  घडत आहेत.या दुर्घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकर्‍यांसाठी व कृषीसेवा केंद्र चालकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे,अशी माहिती विभागीय  कृषी सहसंचालक  विजयकुमार इंगळे यांनी दिली.
राज्यामध्ये पीकसंरक्षणासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकर्‍यांना व शेतमजुरांना विषबाधा होत असल्याच्या घटना घडत असताना जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू  नयेत यासाठी सर्व कृषीसेवा केंद्र चालकांना फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षता याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.त्यानुसार या केंद्रचालकांनी शेतकर्‍यांना तसे मार्गदर्शन  करायचे आहे.फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी ,औषधाची मात्रा किती प्रमाणात घ्यावी,पंप वापराच्या योग्य पद्धती याविषयी मार्गदर्शन करायचे आहे.या उपक्रमांतर्गत सर्व कें द्रांमध्ये माहितीपर भित्तीपत्रके लावण्यात येणार आहेत.
कृषिविभागामार्फत राबवण्यात येणार्‍या या उपक्रमांतर्गत सर्व कृषीसेवा केंद्र चालकांनी सहभागी होऊन शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन करावे असे आवाहन कृषी विभागामार्गात करण्यात  आले,आहेत.