Breaking News

खालच्या पातळीवरच्या प्रचाराला चपराक -अशोक चव्हाण

नांदेड, दि. 13, ऑक्टोबर - नांदेड महापालिकेतील कॉग्रेसच्य विजयात काँग्रेसवर निष्ठा ठेवणार्या प्रत्येक मतदारांचा हात असून नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला  आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. त्यांनी या विजया बददल जनतेची अभार मानले. भाजपने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. नांदेड  महापालिका निवडणुकीत कॉग्रेसचा विजय हा खालच्या पातळीवरच्या प्रचाराला चपराक असल्याची टीका त्यांनी केली. भाजपमध्ये जे लोक नाही, त्यांना जवळ करण्यात आले.  निवडणूक जिंकण्यासाठी बाहेरचे लोक आणले आणि तिथेच भाजपचे गणित चुकले असे ते म्हणाले.
कॉग्रेसचे हिंगोलीतील खासदार व राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव म्हणाले की नांदेड महापालिकेतील कॉग्रेसचा विजय ही या पुढच्या लोकसभा निवडणूकांतील कॉग्रेसच्या  विजयाची नांदी आहे.
अशोक चव्हाण यांचे काम आणि जनतेने कॉग्रेवर दाखवलेला हा विश्‍वास आहे अशी प्रतिक्रीया मराठवाडयातील पदाधिकारी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.