0
औरंगाबाद, दि. 11, ऑक्टोबर - औरंगाबादचा आगामी महापौर शिवसेना-भाजप युतीचाच असेल, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिले आहेत. या बाबत आधी युतीत जसे त्या प्रमाणेच करावे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी  घेतली असून आता औरंगाबादचे महापौरपद शिवसेनेकडे जाणार आहे.
औरंगाबादच्या विदयमान महापौरांचा कार्यकाल संपला असून ठरल्या प्रमाणे हे पद आता शिवसेनेकडे जाणार आहे मात्र भाजपच्या पदाधिक ा-यांनी नांदेड येथील महापालिका निवडणूक प्रचार सभा आटोपून मुख्यमंत्री फडणवीस यांची सोमवारी रात्री औरंगाबादच्या विमानतळावर  आले असता त्यांची भेट घेऊन या बाबत चर्चा केली असता ही निवडणूक युतीच्या माध्यमातूनच लढवा, युतीचाच महापौर झाला पा हिजे,असे आदेश त्यांनी दिल्याचे समजले.आगामी महापौरपद युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आले असून सेनेने नगरसेवक नंदकुमार  घोडेले यांची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे भाजप व त्यांना पाठिंबा दिलेल्या अपक्ष आघाडीच्या नगरसेवक ांना शिवसेना उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री थोडावेळ विमानतळावर थांबून ते पाथर्डीला रवाना झाले. यावेळी आमदार  अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर आदी उपस्थित होते. 

Post a Comment

 
Top