0
जालना, दि. 11, ऑक्टोबर - अखेर जालना येथील बांधकाम व्यावसायिक नितीन कटारिया यांची हत्या प्रकरणातील संशयितास पक डण्यास पोलिसांना यश मिळाले असून त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकमधून ताब्यात घेवून काल रात्री जालन्यात आणले.  सदर इसमाचे नाव सुभाष वैदय असून कटारिया यांच्या हत्येनंतर तो फरार झाला होता. दिवसाढवळया झालेल्या या हत्येमुळे मोठी  खळबळ निर्माण झाली होती. कटारियांना त्यांच्या घरातून बोलावून रस्त्यावरच चाकूने वार करून ठार मारले होते. 19 सप्टेंबरला ही घटना  घडली होती.या बाबत तपास लवरल लावावा या मागणीसाठी व्यापा-यांनी आदोलन केले होते.

Post a Comment

 
Top