0
रायगड, दि. 13, ऑक्टोबर - मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून तर सात जण जखमी झाले आहेत.  पोलादपूरच्या पार्ले गावाजवळ ट्रक आणि मिनीडोअर रिक्षा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात मुझफ्फर येलुकर, नीलम कांबळे, नमीबाई जाधव,  सोहम जाधव या चौघांसह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर दशरथ सुतार, देवांश चाळके, अनिता गणपत पवार, इंदू तळेकर, गीता चाळके, रुद्र चव्हाण, संतोष कोळेक अशी जखमींची नावं आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या  रुग्णालयात दाखल केलं आहे.

Post a Comment

 
Top