0
मुंबई, दि. 11, ऑक्टोबर - पक्षसंघटनेत बदल झाल्याच्या मुद्द्यावरून आज शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि माजी  शाखाप्रमुख राजेश कुसळे यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन शिवसैनिक जखमी झाले असून त्यांना  उपचारासाठी नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षसंघटनेतील बदलाच्या मुद्द्यावर स्थानिक  समर्थकांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. पक्षातील ‘इनकमिंग’मुळे शिवसेनेत अनेकांना पदांपासून वंचित ठेवल्याची भावना र विवारपासून शिवसैनिकांमध्ये होती. वरळी, डीलाईलरोड, भायखळा, प्रभादेवी, लालबाग परळ भागात अनेक शिवसैनिक नाराज होते. त्या  नाराजीतून हा वाद उफाळून आला असल्याचा अंदाज आहे.

Post a Comment

 
Top