Breaking News

मुंबई शहर इलाखाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळकें प्रकरणामुळे साबांला हादरे

सरकारसह भाजपातील अंतर्गत शीत युध्दाची पेरली जाणार बीजे

मुंबई (विशेष प्रतिनिधी)  दि. 13,  ऑक्टोबर - मुंबई शहर इलाखा विभागातील मनोरा आमदार निवास इमारतीचा गैरव्यवहार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंगणात अदृश्य बाँब  ठरण्याचे संकेत प्राप्त होत  असून हा बाँब फुटला तर अनेकांचे प्रशासकीय अन् काहींचे राजकीय जीवन ऊध्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान गैरव्यवहाराला अ नियमितता संबोधून दोषी कार्यकारी अभियंत्यांना अभय देण्याचा साबां मंञ्यांचा प्रयत्नही कळीचा मुद्दा ठरू पहात असून मुख्यमंञ्या महाराष्ट्र वापसी नंतर सार्वजनिक बांधकाम  खात्यासह राजकारणातही हादरे बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचार होणे ही नवलाई उरलेली नाही.या खात्याचा हा शिष्टाचार ठरावा इथपर्यंत या भ्रष्टाचाराने मान्यता मिळवली आहे.साबां प्रशासनात शाखा अ भियंता ते सचिवांपर्यत या भ्रष्टाचाराचे विषाणू पोसले जात आहेत.हे व्हायरल इन्फेक्शन उपचाराचा प्रभाव आहे तो पर्यंत थंडावते.प्रभाव संपला की पुन्हा हा विषाणू साबांला पोखरू  लागतो.टायफाईड उलटावा तसे या भ्रष्टाचाराच्या विषाणूचे कारस्थान सुरू आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उघडकीस येणार्या गुन्ह्यांमध्ये पोलीस कर्मचारी काही अधिकारी आणि चोर दरोडोखोर लुटारूंच्या टोळ्या यांचे लागे बांधे,काही ठिकाणी प्रत्यक्ष भागीदारी  असल्याचे उघड होतांना दिसते,अगदी याच धर्तीवर सार्वजनिक बांधकाम खात्यात देखिल वरिष्ठांनी कनिष्ठांशी संगनमत करून लाखो करोडोंचा भ्रष्टाचार केल्याची उदाहरणे आहेत,नव्हे  साबांत वरिष्ठांच्या सहमती शिवाय भ्रष्टाचार होऊ शकत नाही अशी या खात्याची कार्य उतरंड परस्परांशी संबंधित आहे.ही साखळी जिथे तुटते तिथे भ्रष्टाचार झाल्याच्या बातमीला पाय  फुटतात.मग हे प्रकरण मंञ्यांच्या दरबारात जाते.मंञी पातळीवर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला जातो.आजपर्यंत साधारण भ्रष्टाचाराचे प्रकरण निकाली काढण्याचा हा शिरस्ता होता.
सध्या चर्चेत असलेले मनोरा आमदार निवास इमारतीतील गैरव्यवहाराचे प्रकरणही याच मार्गावरून प्रवास करीत मंञी महोदयांच्या दरबारात पोहचले  मंञी महोदयांनी या प्रकरणाकडे  अधिकार्यांनी दिलेल्या माहितीवर विसंबून पारंपारीक पध्दतीने निकाली काढीत गैरव्यवहाराला अनियमिततेच्या वज्रलेपात गुंडाळण्याचा प्रयत्न केला .तथापी सत्ताधारी पक्षाचे तुमसरचे  आमदार आणि अंदाज पञक समितीचे सदस्य चरणभाऊ वाघमारे यांनी घेतलेली ठाम भुमिका या प्रकरणाला वाचा फोडण्यास कारणीभूत ठरली.तब्बल सहा वेळा मुख्यमंञी आणि  साबां मंञी चंद्रकांत दादा पाटील,प्रधान सचिव (बांधकाम) आशिषकुमार सिंह यांच्याशी पञव्यवहार करून पाठपुरावा गेला.या गैरव्यवहारात साबांतील वरिष्ठ कनिष्ठ समप्रमाणात  सहभागी आहेत,शासकीय निधीच्या लुटीतून मिळालेल्या रकमेचे लाभार्थी आहेत.हे संघटीत कटकारस्थान आहे.प्रथम दर्शनी त्याचे सारे पुरावे उपलब्ध आहेत हे वारंवार आ.चरणभाऊ  वाघमारे यांनी निदर्शनास आणल्यानंतर शासन आणि प्रशासन ढिम्मपणे मुख्य संशयितांना वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे गेल्या पाच सहा दिवसात प्रकर्षाने दिसले.
या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही त्यांच्याच सरकारचे साबांमंञी चंद्रकांत दादा पाटील भ्रष्ट अभियंत्यांना निलंबीत करून त्यांच्याविरूध्द संघटीत होऊन कटकारस्थान  करून शासकीय निधीचा अपहार केल्याचा गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्याऐवजी ही अनियमितता आहे अशी मल्लीनाथी करतात.याचा अर्थ लोकप्रतिनिधी विशेष म्हणजे स्वपक्षाच्या  आमदारांपेक्षा सबांमंञ्यांना भ्रष्ट अभियंत्यांशी हितसंबंध जपणे जपणे अधिक मोलाचे वाटते.आणि इथेच आ,चरणभाऊ वाघमारे यांच्या प्रतिष्ठेला डंख मारण्याचे साबां यंञणेचे षडयंञ  उघड झाले.
आ.चरणभाऊ वाघमारे यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्धार केला असून मुख्यमंञ्यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी तसे आश्‍वासनही घेतल्याचे समजते.मुख्यमंञी सध्या  स्वीडनच्या दौर्यावर आहेत, महाराष्ट्रात परतल्यानंतर येत्या दोनचार दिवसात आ,चरणभाऊ वाघमारे यांच्या मागणीला न्याय मिळण्याचे संकेत आहेत.
अर्थात मुख्यमंञी फडणवीस यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर साबांत आणखी बाँब फुटण्याचे संकेत आसून या गौप्य स्फोटाच्या दाहकतेत काही आजी माजी वरिष्ठांची झाकलेली पापही  बाहेर आणण्याची धमकी एका गटाकडून व्हायरल केली जात आहे.