Breaking News

फटाके विक्रीला बंदी करण्यास राज ठाकरेंचा विरोध

मुंबई , दि. 11, ऑक्टोबर - मुंबई शहरात निवासी भागात फटाके विक्रीला बंदी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला महाराष्ट्र नव निर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे . वर्षानुवर्षे दिवाळीत फटाके फोडले जात आहेत . आता न्यायालयाने बंदी घातल्यावर व्हॉट्स अप वर  फटाके फोडायचे का अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली . सण साजरे करण्याच्या परंपरागत पद्धतीवर  अशा पद्धतीने बंधने येऊ लागली तर सर्व सण साजरे करणे बंद करा , सणांच्या शासकीय सुट्ट्या रद्द करा असेही राज ठाकरे यांनी सां गितले . 
मुंबई उच्च न्यायालयाच्या बंदीच्या आदेशानंतर फटाके विक्रीवरील बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून अंतीम निर्णय  घेतला जाईल असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले . त्या नंतर राज ठाकरे यांनी अशा पद्धतीने फटाके विक्रीला बंदी घालण्यास  कडाडून विरोध दर्शविला आहे .
दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही फटाके विक्री करण्यास बंदी घातली जावी अशी मागणी केली जाते आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पर्यावरण मंत्री रामदास क दम यांनी अशा बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असे सांगितले .मात्र फटाके विक्रीला बंदी क रण्यास रामदास कदम यांच्या शिवसेनेतूनही विरोध असल्याचे स्पष्ट झाले . शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही फटाके विक्रीला बंदी  घालण्यास विरोध दर्शविला आहे.