Breaking News

लाचप्रकरणी वैधमापनशास्त्र विभागाचा निरीक्षक गजाआड

सातारा, दि. 9 (प्रतिनिधी) : तक्रारदाराचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे पडताळणी व मुद्रांकन करुन ते प्रमाणित असल्याचे पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी 1100 रुपये  लाच मागणी करुन 500 रुपयांची लाच घेताना वैधमापन शास्त्र विभागातील निरीक्षक लक्ष्मण साहेबराव कांबळे (वय 46, सध्या रा. शंकर निकम यांचे दुर्गा  अपार्टमेंट, फलॅट नं. 2, रविवार पेठ, मूळ रा. सर्व्हे नं. 22/1, थिटे वस्ती, मुंढवा, चंदननगर रोड, खराडी, पुणे यांना लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर विभागाने सापळा रचून वैधमापन शास्त्र विभागातील निरीक्षक लक्ष्मण कांबळे यांना  तक्रारदाराकडून इलेक्ट्रॉनिक वजन काटे पडताळणी व मुद्रांकन करुन ते प्रमाणित असल्याचे पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती 500 रुपयांची लाच  घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरीफ मुल्ला,  बी. एस. कुरळे, जयंत कुलकर्णी, व सहकारी यांनी केली.