Breaking News

वीज पडून एक ठार एक जखमी

उस्मानाबाद, दि. 09, ऑक्टोबर - उस्मानाबाद जिल्हयातील वाशी जवळील कण्हेरी (ता. वाशी) शिवारात वीज पडून रमेश एकनाथ कवडे हे शेतकरी जागीच ठार  झाले.तर त्यांचे बंधु निवास कवडे हे गंभीर जखमी झाले.आज दुपारी एक ते दोनच्या दरम्यान जोरात कडकडाट करत वीज त्यांच्या अंगावर पडली.त्यांच्या पासून दुर  असल्याने गुरे
वाचली.ते एका झाडाखाली उभे होते.