Breaking News

आणखी एका कर्जबाजारी शेतक-याच्या मुलीची आत्महत्या

नांदेड, दि. 05, ऑक्टोबर - नांदेडमध्ये आणखी एका कर्जबाजारी शेतक-याच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.पुजा शिरगारे असेे या मुलीचेे नाव  आहे. आपले वडील अधीच कर्जबाजारी असल्याने त्यांना आपल्या लग्नाच्या खर्चाचे ओझे नको म्हणून आपण हे पाऊल उचलले असल्याचे पूजाने आत्महत्त्येपुर्वी  लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ’बाबा मला माफ करा’ असे तिने पत्रात म्हटले आहे. नांदेड जिल्हयातील ही दुसरी घटना आहे.