Breaking News

मराठी अल्बमसाठी लागणार चित्रपट महामंडळाची परवानगी

पुणे, दि, 12, ऑक्टोबर - मराठी चित्रपटांच्या धर्तीवर आता मराठी गितांच्या अल्बमलाही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे. कलावंत, तंत्रज्ञाची फसवणुक, लुबाडणुक होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले  यांनी बुधवारी दिली. 
सुमित कॅसेटच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आला बाबुराव या गीताच्या अल्बममध्ये सहभागी कलाकार सुरेश कांबळे यांनी कंपनीने आपली फसवणुक केल्याचा आरोप  प्रसारमाध्यमातुन केला होता. या पार्श्‍वभुमीवर आयोजीत पत्रकार परिषदेत मेघराज राजेभोसले बोलत होते. यावेळी सुमित कॅसेटचे सुभाष परदेशी, या गिताचे लेखक आणि गायक रोमिओ क ांबळे, नृत्यदिग्दर्शक विपुल लद्दे उपस्थित होते.
राजेभोसले म्हणाले, सुरेश कांबळे यांच्या आरोपाची सत्यता चित्रपट महामंडळाने पडताळली असता या कंपनीने त्यांची कोणत्याही प्रकारची फसवणुक केली नसल्याचे दिसून आले, यामुळे  भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी चित्रपट महामंडळाने हा निर्णय घेतला आहे, या निर्णयाला म्युझीक कंपन्यांनीही संमती दिली आहे. दरम्यान, कोणत्याही कलाकाराने खोटी ग रिबी दाखवून सहानुभूती घेऊ नये. कलाकारांनी आणि निर्मात्यांनी एकत्र येऊन यातून मार्ग काढावा असे अवाहन त्यांनी केले.
सुभाष परदेशी म्हणाले, या लोकगिताचे लेखन आणि गायन रोमिओ कांबळे यांनी केले आहे. मात्र, या चित्रीकरणातील बाबुरावची मुख्य भूमिका साकारणार्‍या सुरेश कांबळे यांनी हे गाणे  आपण गायल्याचे आणि सुमित कॅसेटने आपले पैसे बुडविल्याचा खोटा आरोप केला आहे, रोमिओ हेच या गीताचे लेखक आणि गायक असून, सोनू अजमेरी यांनी या गीताला संगीत दिले  आहे. अल्पावधीतच या गाण्याला प्रसिद्धी मिळाल्याने आम्ही त्याचे चित्रिकरण करण्याचा निर्णय घेतला. या चित्रिकरणाचे कॉन्ट्रक्ट नृत्यदिग्दर्शक विपुल लद्दे यांना देण्यात आले होते. त्यासाठी  लद्दे यांना एक लाख दहा हजारांचे पॅकेज देण्यात आले. त्यामध्ये कलाकारांचे मानधन, कॅमेरा टेक्नीशियन आणि इतर खर्च सामाविष्ट होता. त्यामुळे कांबळे यांनी सुमित कॅसेटवर पैसे  बुडवल्याचा केलेला आरोप खोटा आहे.
रोमिओ कांबळे म्हणाले, 15 जानेवारी 2017 रोजी हे व्हिडीओ गाणे युटयूबवर प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर हे गाणे इतर मराठी चॅनेल्सवर मोफत प्रदर्शित केले. त्यामुळे या कलाक ारांची महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली. मात्र, केवळ प्रसिद्धीसाठी काही जण जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत.
विपुल लद्दे म्हणाले, मी कोणत्याही कलाकाराची फसवणुक केलेली नाही, सर्व कलाकारांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही शुट केले होते. कांबळे यांचा सर्व खर्च मी केलेला आहे, तसेच क ांबळे यांचा थेट सुमित कॅसेटशी कसलाही संबध येत नाही.