Breaking News

मालेगाव बॉम्बस्फोट : समीर कुलकर्णी यांना जामीन मंजूर

मुंबइ, दि, 12, ऑक्टोबर - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. गेल्या काही महिन्यांत  साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी या आरोपींना जामीन देण्यात आला. त्यानंतर आता जामिनावर सुटका झालेले कुलकर्णी हे  सहावे आरोपी आहेत. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार, तर शेकडो जखमी झाले होते. या स्फोटाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने 12  जणांना अटक केली होती.