0
सोलापूर, दि. 06, ऑक्टोबर - जुळेसोलापुरातील म्हाडा कॉलनीजवळील सावन हॉटेलच्या सपना लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले. गुन्हे  शाखेने छापा टाकून दोन बंगाली मुलींसह एजंटला ताब्यात घेतले. लॉजचा चालक आणि मालकावर ‘पिटा’अंतर्गत कारवाई करणार असल्याचे पोलिस उपायुक्त  पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.
जुळे सोलापुरातील मुख्य चौकात असलेल्या या लॉजमध्ये उघड पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांना मिळाली. त्यांनी  चौगुले, सहायक आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, सूर्यकांत पाटील यांना कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने  छापा टाकला. त्या वेळी लॉजमधल्या दोन खोल्यांमध्ये बंगाली मुली आणि एक जोडपे आढळून आले. परमेश्‍वर शिंदे या एजंटला ताब्यात घेण्यात आले.
हॉटेल सीताराम महांकाळ यांनी पाच वर्षांच्या करारावर चालवण्यास घेतले आहे. येथील कर्मचार्‍यांकडून माहिती घेतल्यानंतर एजंटनेच खोल्या घेऊन मुलींना  ठेवल्याचे सांगण्यात आले. याबाबत एजंटची चौकशी करताना वेगवेगळ्या नावांचे चार आयडेंटीटी कार्ड सापडले. त्याला विविध भाषा अवगत असल्याचेही दिसून  आले. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक मधुरा भास्कर, भीमसेन जाधव, अप्पा पवार, सुभाष पवार, सनी राठोड, उमेश सावंत यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

 
Top