Breaking News

ऑस्ट्रेलिया संघ : दगडफेक प्रकरण दोन संशयित ताब्यात

गुवाहाटी , दि. 12, ऑक्टोबर - भारताविरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्याहून हॉटेलमध्ये परतत असताना ऑस्ट्रेलिया संघाच्या बसवर दगड फेकण्यात आला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी  दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची याप्रकरणी चौकशी सुरु आहे.
या दगडफेकीत एकाचा खिडकीची काच फुटली होती. पण सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही. मात्र, या प्रकरणी गुवाहटी पोलिसांनी गांभीर्यानं लक्ष देत तात्काळ चौकशी सुरु केली  आहे. या घटनेनंतर आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवालनं ट्विट केलं आहे. ‘एका चांगल्या सामन्यानंतर या घटनेनं गुवाहटी शहराच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. या घटनेचा आम्ही तीव्र  शब्दात निषेध करतो. तसंच यासाठी आम्ही माफीही मागतो. आसामचे नागरिक कधीही यासारख्या घटनेचं समर्थन करणार नाही. आम्ही दोषींना नक्कीच शिक्षा करु.