0
ऑकलंड, दि. 13, ऑक्टोबर - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्‍वचषकात ज्या प्रमाणे सर्व संघ एकत्र खेळतात, त्याच प्रमाणे आता कसोटी क्रिकेटमध्येही सर्व संघ एकत्र खेळलेले पाहायला मिळणार आहेत. आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप आणि वन डे लीगसाठी मान्यता दिली आहे. ऑकलंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या नियमन मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. गेल्या दोन वर्षांपासून यावर विचार सुरु होता.
वन डे प्रमाणेच आता कसोटी चॅम्पियनशिप खेळवली जाणार आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीतील पहिले नऊ संघ सहा कसोटी मालिका खेळतील. तीन मालिका घरच्या मैदानावर  होतील, तर तीन मालिका प्रतिस्पर्धी देशात होतील. 2019 च्या विश्‍वचषकानंतर कसोटी क्रिकेटमधील या नव्या पर्वाला सुरुवात होईल. प्रत्येक संघाला किमान दोन कसोटी सामने  खेळणं आवश्यक असून मालिकेत या सामन्यांची संख्या पाचपर्यंत वाढवता येऊ शकते.

Post a Comment

 
Top