Breaking News

मेगा शटडाउन मुळे औरंगाबादवर सहा दिवसाच्या निर्जळीचे संकट

औरंगाबाद, दि. 07, ऑक्टोबर - औरंगाबादला पाणीपुरवठा करणार्या दोन्ही मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी महापालिकेतर्फे शुक्रवारी सकाळी 11पासून 36 तासांसाठी मेगा शटडाउन घेतले जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना सलग पाच ते सहा दिवस निर्जळीला सामोरे जावे लागणार आहे. मेगा शटडाउनसंदर्भात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत 100 व 56 दशलक्ष लीटर या दोन्ही योजनेवरील अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी, फारोळा येथील क्लोरिफलोक्युरेटरमधील गाळ काढण्यासाठी; तसेच अन्य स्वच्छतेच्या कामांसाठी सहा ऑक्टोबरच्या सकाळी 11पासून किमान 36 तासांपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात संपूर्ण शहर व सिडको भागात पाणीपुरवठा होणार नाही. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक किंवा दोन दिवसांनी पुढ ढकलण्यात येणार आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पुढील तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. दुरुस्तीचे काम दीड दिवस पालिकेच्या निवेदनानुसार दीड दिवस दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल. म्हणजे पाच ते सहा दिवस नागारिकांनां निर्जंर्ळाला सामारे जावे लागणार आहे.