Breaking News

राज्यमहामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर - अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनमाड राज्यमहामार्ग बनत चाललाय मृत्यूचा थेट महामार्ग जिल्ह्यातील दळणळवणसाठी महत्त्वाचा असा दक्षिण  उत्तर विभागाला जोडणारा रस्ता विळद घाट ते कोल्हार खुर्द पर्यंत जागोजागी उखडला असून रस्त्याची अवस्था खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी झाली आहे या महामार्गाच्या  दयनीय अवस्थेकडे जागतिक बँक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम (रस्तेबांधणी) विभाग यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले तर आहेच मात्र जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमदार  खासदार यांचेही अक्षम्य असे दुर्लक्ष झालेले आहे उत्तरेकडे राहुरी,संगमनेर,अकोले,कोपरगाव,श्रीरामपुर,
राहाता हे तालुके व या तालुक्याचे आमदार तसेच दक्षिण व उत्तरेचे खासदार यांना या रस्त्याची झालेली दुरावस्था दिसत नाही काय ? तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते यांचा राहाता हा  मतदार संघ तसेच जि.प.च्या अध्यक्षांचे गावही उत्तरेस असे सर्व दिग्गज या रस्त्याने ये जा करत असतात त्यांना हा उखडलेला महामार्ग दिसत नाही काय ? असा सवाल या  रस्त्याने मार्गक्रमण करणारे प्रवासी व वाहनचालक करताना दिसतात 
नगर मनमाड महामामार्गावरिल पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची दुर्देवी वेळ जागतिक बँकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निष्क ाळजीपणामुळे ओढवल्याने या खात्याबाबत प्रवाशी व वाहनधारकांमध्ये मोठी संतापाची प्रतीक्रिया उमटत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याची निष्क्रियता चव्हाट्यावर आली  आहे.
राहुरी शहरातून जाणारा नगर मनमाड महामार्ग जागोजागी उखडला आहे रस्त्यावर जीवघेण्या खड्ड्यांची रासच दिसून येते यामुळे वाहनधारकांना रस्त्याने जाता येता कसरत क रण्याची वेळ सां.बा.विभागाच्या दुर्लक्षाने आल्याचे चित्र राहुरी खुर्द ते राहुरी साखर कारखाना भागातून जाणार्‍या रस्त्यावर दिसत आहे शहरातील बसस्थानक परिसरात जिजाऊँ चौक ात मोठ्या आकाराचे खड्डे तयार झाले आहेत या चौकात बसस्थानकाकडे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वळत असताना नेमके या खड्ड्यातून बस वळवताना चालकांना नाक ीनऊ येतात तसेच येथे वाहतुकीचा खोळंबा होवून रस्त्यावर चक्काजाम होण्याची स्थिती ओढवली आहे या चौकातून साधारण दोनशे फुटावर येवले कॉम्पलेक्स परिसारातही रिक्षा स्ट ँडजवळ रस्ता उखडून जीवघेणा खड्डा तयार झाला आहे तसेच धावडे पेट्रोल पंपासमोर स्टेट बँकेच्या बाजूकडील रस्त्यावरही मधोमध मोठ्ठा खड्डा पडला असल्याने वाहनचालकांवर क सरत करण्याची वेळ आली आहे राहुरी खुर्द येथेही ग्रामपंचायत कार्यालय व लक्ष्मीमाता मंदीर परिसरातही खड्डे तयार झाले आहेत हे खड्डे अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहेत  अशीच स्थिती राहुरी कारखाना येथील स्टेट बँकेच्या समोरील रस्त्याची झालेली आहे पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचत असल्याने मोठ्या वाहनचालक व दुचाकीस्वारांना याचा  अंदाज नसल्याने छोठेमोठे अपघातही घडत असल्याने अनेकांच्या जीवावर बेतण्याची परिस्थिती महामार्ग खड्ड्यात गेल्याने ओढवली आहे
पावसाळ्यापूर्वी महामार्गावरिल खड्डे दुरुस्त करुन बुजवणे क्रमप्राप्त असताना सा.बां.विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे लवकरात लवकर महामार्गावरिल खड्डे दुरुस्त झाले  नाही तर मोठ्या अपघाताची शक्यता वाहनचालकांमधून व्यक्त होत असून प्रवाशी व वाहनधारक रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत संताप व्यक्त करताना दिसत आहेत जागतिक बँक  प्रकल्प व सा.बां.विभाग यांच्या दुर्लक्षाने महत्वाचा महामार्ग आज कोमात गेला असून प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची वेळ येवून ठेपली आहे परतीच्या पावसाने महामार्ग तर अत्यंत  खराब झाला आहे या महामार्गावर खड्डे बुजवताना प्रशासन जूजबी तात्पुरता मुलामा करताना दिसत आहे खड्ड्यांमधे भीजलेला मुरुम व मातीमिश्रीत खडी टाकून आणखीनच रस्ता  ओबडधोबड करण्याचे काम चालू असते व पावसातच बुजवलेल्या खड्ड्यात डांबर ओतून काळीमलाई खाण्याचे काम राजरोसपणे सुरु आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते व संघटना  लवकरच आंदोलन उभारण्याच्या पवित्र्यात आहेत
नगर मनमाड राज्य महामार्गावर शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तिर्थस्थळ आहे तसेच राहुरीपासून अवघ्या 22 कि,मी.अंतरावर दुसरे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शनी शिंगणापुर हे तिर्थस्थळ  आहे सध्या शिर्डी नगरीत साईंच्या समाधी सोहळ्याचे शताब्दी वर्षाची तयारी सुरु आहे या पार्श्‍वभूमीवर या महामार्गावर वाहतुक ही वाढणार आहे त्यामुळे रोजच्या वर्दळीत आणखी भर  पडणार असल्याने या रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे भाविकांबरोबरच जनतेच्या सुरक्षेसाठी महामार्ग तातडीने दुरुस्त व्हायला हवा अन्यथा महामार्गावर अपघातांची मालिका  सुरुच राहणार हे अटळ आहे.