Breaking News

सणांवरील निर्बंधांचा अतिरेक केल्यास असंतोषाचा स्फोट होईल - उद्धव

मुंबई, दि, 12, ऑक्टोबर - हिंदूंच्या सणांवरील निर्बंधांचा अतिरेक केल्यास सामान्य जनतेतील असंतोषाचा स्फोट होईल , असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज येथे  बोलताना दिला . 
उच्च न्यायालयाने मंगळवारी फटाके विक्रीला बंदी घालण्याचा आदेश दिला आहे . या पार्श्‍व्भूमीवर आज पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाच्या आदेशाबाबत संतप्त भावना  व्यक्त केल्या .