Breaking News

नवरात्रात सात मंदीरांना आठ लाखापेक्षा अधिक उत्पन्न

औरंगाबाद, दि. 11, ऑक्टोबर - नवरात्र महोत्सावाच्या काळात दानपेटीतून देवीच्या मंदीरांना मिळालेल्या उत्पन्नाची माहिती धर्मदाय  आयुक्तांकडे त्या त्या देवस्थानने सादर केली आहे.सात मंदिरांना 8 लाखांपेक्षा अधिक दान मिळाले आहे.नवरात्र महोत्सव काळात मंदीरांना  किती दान येते. त्यावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने लक्ष ठेवले होते. औरंगाबाद जिल्ह्यात महत्वाची 12 मंदिरे आहेत. या मंदिरांच्या  दानपेट्या सील करण्यात आल्या होत्या. त्यातील सात मंदिराच्या दानपेट्याचे सील उघडून आलेल्या पैशाचे मोजमाप करण्यात  आले.त्यात सात मंदीरांना एकूण 8 लाख 32 हजार 750 मिळाले आठ लाखांपेक्षा अधिक दान मिळाल्याचे निदर्शनास आले.जळगाव  रोडवरील रेणुका माता मंदिराला सर्वाधिक म्हणजे 5 लाख 43 हजार 280 रुपये जमा झाले आहेत.