Breaking News

माजी राष्ट्रपती स्व.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’

बुलडाणा, दि. 11, ऑक्टोबर - देशाचे माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर रोजी येणारा जन्म दिवस वाचन प्रेरणा  दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शालेय व रमहािूवद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड  वृद्धींगत करण्याच्यादृष्टीने हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा येथे कार्यक्रमांचे आयोजन क रण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी, शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास वाचनासाठी द्यावा.  तरी 15 ऑक्टोंबर 2017 रोजी वाचन प्ररेणा दिनाचे आयोजन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले  आहे. वाचन प्रेरणा दिवस सर्वच स्तरावर साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.