0
नवी दिल्ली, दि. 13, ऑक्टोबर - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कार चोरीला गेली आहे. केजरीवालांच्या साध्या राहणीची ओळख असलेली निळ्या रंगाची व्हॅगन-आर कार सचिवालयासमोरुन चोरीला गेली.
दिल्ली पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे केंद्राचं ‘ध्यान कुठे आहे?’ हे ट्वीट केजरीवालांनी रीट्वीट केलं आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना ही कार चोरीला  गेल्याने हा दिल्ली पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न झाला आहे. परदेशी राहणार्‍या भारतीयाकडून ही कार केजरीवालांना भेट मिळाली होती. व्हीआयपी कल्चरचा विरोध म्हणून ‘आम आदमी  पक्षा’ने या निळ्या व्हॅगन आरचा प्रतिकात्मक वापर केला होता.

Post a Comment

 
Top