Breaking News

ऐन दिवाळीमध्ये एसटीची प्रवाशांना तिकीट दरवाढीची भेट

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर - राज्य परिवहन महामंडळाने  ऐन दिवाळी उत्सवामध्ये तिकिटाच्या दरामध्ये वाढ करून प्रवाशांना महागाईचा आणखी एक धक्का दिला आहे.पूर्वी  असणार्‍या दरापेक्षा प्रतिटप्पा दिड  ते दोन  रु दर  वाढवला  आहे. आज मध्यरात्रीपासून हे दर वाढणार आहेत.
दिवाळी उत्सवामध्ये  राज्य परिवहन महामंडळाने ( एस.टी ) दिनांक 13 ऑक्टोबर 2017 च्या  मध्यरात्री पासून प्रवासी तिकीट दरात बदल केले असून  हा बदल  दिनांक 31   ऑक्टोबर 2017  च्या मध्यरात्री पर्यंत लागू राहणार आहे.  या बदलानुसार  ग्रामीण भागातील साधी व जलद बसगाडीचे भाडे 6 रुपये 95  पैसे , रातराणी बससेवेचे भाडे रुपये 8  रु.20 पैसे   पैसे  तसेच निमआराम बससेवेकरिता रुपये 9 रु.90 पैसे पैसे  अशा पद्धतीचे  वाढीव  भाडे आकारण्यात येणार आहे.
ही  दरवाढ हंगामी स्वरूपामधील असून दिवाळीच्या हंगामामध्ये खाजगी वाहतूक कंपन्यांकडून   तिकिटांच्या दरात वाढ करण्यात येते,त्या अनुषंगाने महामंडळाने ही वाढ केली  आहे.या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढलेली असते त्यामुळे या दरवाढीने राज्य परिवहन महामंडळाला चांगला फायदा होतो अशी माहिती विभाग नियंत्रक नितीन मैड यांनी दिली.