Breaking News

बीड जिल्ह्यात विजेचे तांडवर : सहा ठार

बीड, दि. 08, ऑक्टोबर - परतीच्या पावसात मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला असताना आज पावसाबरोबरच विजेचे तांडव अनुभवाला आले. बीड  जिल्ह्यातील धारूर तालुक्यात चारदरी येथे  (शनिवार) सायंकाळी पावसात झाडाखाली थांबलेल्या दहा जणोवर वीज कोसळवी त्यात पाच जण जागीच ठार  झाले. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. दुसर्या एका घटनेत माजलगाव तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यात वीज पडून एकूण सहा  ठार झाले. 
चारदरी येथेे झालेल्या घटनेत मरण पावलेल्यांची नावे याप्रमाणे आहेत, आसाराम रघुनाथ आघाव (28), उषा आसाराम आघाव (25), दिपाली मच्छींद्र घोळवे  (21), शिवशाला विठ्ठल मुंडे (21), वैशाली संतोष मुंडे (25) अशी वीज कोसळून ठार झालेल्यांची नावे आहेत. या घटनेत सुमन भगवान तिडके (45), रुक्मिण  बाबासाहेब घोळवे (52), कुसाबाई नामदेव घोळवे (45), सिताबाई दादासाहेब घोळवे (25), सुरेखा आबासाहेब आघाव (17) हे भाजून गंभीर जखमी झाले असून  त्यांना उपचारासाठी धारूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चारदरी ये-े हे सर्वजण बाजरी काढण्याचे काम करत असताना पावसाला  सुरूवात झाली. अडोसा म्हणून ते झाडाखाली थांबले आणि त्यांच्याअंगावर वीज कोसळली. दुसर्या घटनेत माजलगाव येथे शेतात काम करताना पावसाचे आगमन  झाले म्हणून झाडाखाली थांबलेल्या राधाबाई दामोदर कोळसे वय 55 या महिलेवर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.