Breaking News

मध्य प्रदेशातही पेट्रोल, डिझेल स्वस्त

भोपाळ, दि. 13, ऑक्टोबर - पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतीपासून दिलासा देण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातनंतर आता मध्य प्रदेश सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलवरील 3 टक्के आणि डिझेलवरील 5 टक्के व्हॅट एमपी सरकारने कमी केला आहे.
केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. पेट्रोल 2, तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त झालं आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू  होतील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.