Breaking News

सिंदखेड राजा ते दुसरबीड राज्य महामार्ग बनला अनेक खड्डयांचे माहेरघर!

बुलडाणा, दि. 06, ऑक्टोबर - सिंदखेड राजा तालुक्यातील जाणारा मुंबई ते नागपूर हा खड्याचा महामार्ग झाला आहे.सिंदखेड राजा ते दुसरबीड पर्यत महामार्ग वर खड्यामुळे दिवसेंदिवस अपघाताच्या घटना मध्ये वाढ झाल्याने वाहनधारकांनी प्रशासनाने सदर मार्गाकडे लक्ष न दिल्या मुळे खड्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जावून अनेकांना मृत्यू व अपंगत्वास बळी पडावे लागत असल्याचे मत व्यक्त केले आहे. या मुंबई ते नागपूर या दरम्यानच्या अंतराचा कमी पला म्हणून या मार्गाची ओळ्खक असताना हा मार्ग मोठं मोठ्या खड्याच्या विळख्यात सापडला आहे.
यावर काही महिन्यापुवी देखावा दाखवत खडे बजविण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र काही दिवसात खडे पडण्यास पुन्हा सुरुवात झाली असून अपघाताच्या ही घटनांत वाढ झाली आहे.त्यामध्ये काहींचे नाहक बळी तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.या महामार्गावरून दररोज हजारो वाहने येजा करतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. सावजनिक बांधकाम विभागाच्या उद्यासीन कारभारामुळे खडे पडलेले आहे.काही महिन्या अगोदर महामार्गावरील खडे डांबर टाकून बुजविण्यात आले होते.परंतु काही महिन्यात उखड्याने महामार्गावरील रस्ताची अवस्था रस्तात खडे नवे तर खड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे.त्यामुळे वाहन चालकांना या खड्यातून जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
भारत पेट्रोल पंपाजवळ, निसर्ग ढाबा, पळसखेड चक्का गावाजवळ, पीपळगांव लेंडी, किनगांव राजा येथील पातळगंगा नदीवरील पुलावर खडे असून त्या ठिकाणावरून शालेय विद्यार्थ्यांना दररोज जावे लागते, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे.राहेरी बु च्या बसस्थांनकांवर मोठमोठे खडे झालेले आहे. दुसरबीड च्या जवळ सुद्धा खडे आहे.या खड्याकडे बांधकाम विभागाने लक्ष देवून खडे बुजविण्यात यावे अशी मागणी वाहनधारका कडून, ग्रामस्थांकडून होत आहे.