0
नवी दिल्ली, दि. 09, ऑक्टोबर - भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, बंगारु लक्ष्मण, नितीन गडकरी या भाजपच्या माजी अध्यक्षांचा आदर्श घेऊन अमित  शाहांनी आता आरोपानंतर तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. नितीन गडकरी हे अध्यक्ष असताना त्यांच्यावर पूर्ती कंपनीतल्या गैरव्यवहाराचे  आरोप झाले. त्यावर गडकरींनी तातडीने राजीनामा दिला. या प्रकरणी पुढे कुठली केसही चालली नाही. जर भाजप केवळ आरोपानंतर गडकरींचा राजीनामा घेऊ  शकते, तर त्यांनी आता अमित शाहांचाही नैतिकदृष्ट्या राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Post a Comment

 
Top