Breaking News

पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची अंमलबजावणी करा - वाडेकर

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर - शासनाने नुकताच पञकार हल्लाविरोधी कायदा मसुदा तयार करत घोषणा  केली. माञ अद्यापही या कायद्याचा अध्यादेश जारी न झाल्याने  याबाबत लवकरच लढा उभारणार  असल्याचे संघटनेचे मार्गदर्शक पञकार राजेंद्र वाडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, चळवळ करण्याची खरी प्रेरणा ही ग्रामीण भागातूनच मिळते. इ तिहास बघितला तर नुकतेच झालेले शेतकरी आंदोलन, जेष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेली विविध  आंदोलने हे बाळकडू ग्रामीण भागातूनच मिळालेले आहेत.
यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात जिल्हा कार्याअध्यक्षपदी संतोष जाधव, प्रभारी जिल्हा संपर्क प्रमुख पदी हरीभाऊ बिडवे, राहुरी शहर प्रमुख पदी शरद पाचारने  तर कार्यकारिणी सदस्यपदी अशोक मंडलीक, मनोज हासे यांची निवड करण्यात आली. यावेळी  पञकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जालींदर ढोकणे, भरत  थोरात, महेश गुंड आदींसह पञकार उपस्थित होते.दरम्यान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे  सर्वत्र अभिनंदन होत आहे. दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यालयात रासपाच्यावतीने ग्रामीण पत्रकार संघाचे नूतन जिल्हा कार्याध्यक्ष संतोष जाधव व राहुरी शहराध्यक्ष शरद  पाचारणे यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारितेत समाजहितासाठी कार्यरत रहावे, असे आवाहन राहुरी बाजार समितीचे माजी संचालक कैलास केसकर केले.
याप्रसंगी पत्रकार बाळासाहेब नवगिरे, रासपचे राहुरी शहराध्यक्ष भारत मतकर, ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव अनिल कोळसे, जिल्हाकोषाध्यक्ष विनित धसाळ, पत्रकार संघाचे तालूका  सचिव मनोज साळवे, रासपाचे पदाधिकारी भारत शिंदे, नवनाथ भुसारे, अमोल देवरे आदी उपस्थित होते.