0
जालना, दि, 12, ऑक्टोबर - विकणा-या टोळीतील दोघांना जळगावमधुन पोलिसांनी काल रात्री अटक केली असून ही टोळी राज्यभरात कार्यरत असल्याचा पोलिसांचा कयास खरा ठरला  आहे. 
जालन्यात आपल्याकडे कामासाठी येणा-या आठरा वर्षाच्या मुलीला पोलिस क्वॉर्टरमध्ये राहणा-या एका महिलेने 18 ऑगस्ट 2017 ला महिलेने फुस लावुन राजस्थानमध्ये सुजितकुमार  मोतीलाल लोहार या इसमास अडीच लाखाला विकले होते या माणसाने आठ दिवस त्या मुलीवर बलात्कार केला होता.मुलीच्या पालकांनी मुलीला सदर महिलेनेच गायब केल्याचा संशय  व्यक्त केला होता त्यावरून पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता सदर महिलेला अटक केल्यानंतर राजस्थानातील वृषभदेव (ता. खेरवाडा, जि. उदयपूर) येथून लोहार याला अटक  केली. सदर मुलीची सुटका केल्यानंतर जालना पोलिसांनी आता जळगाव जिल्हयातील पहूर पोलिसांच्या मदतीने वाकोद येथील सुरेश शिवारे व दुस-या एका ठिकाणावरून सुभाष भोई या  दोघांना अटक केली. या प्रकरणात आणखी दोघे आरोपी असून मुलींची विक्री करणारी ही टोळी महाराष्ट्रभर असल्याचा संशय खरा ठरत आहे.

Post a Comment

 
Top