Breaking News

राज्याच्या स्थितीबाबत सुप्रियाताईंच्या प्रशंसेने अनेकांच्या भुवया उंचावल्या

बीड, दि. 11, ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी अंबाजोगाई येथे युवा जागर संवाद कार्यक्रमात  बोलताना चक्क महाराष्ट्र राज्य सरकारची अप्रत्यक्षरित्या प्रसंशा केली. देशात महाराष्ट्र एक सुरक्षित राज्य आहे. अंगरक्षक नसताना मी कुठेही  फिरते. एखादी घटना घडली तर त्याचा दोष पोलिसांना देता कामा नये पोलिसांवर अविश्‍वास दाखवायला नको असे खा. सुळे म्हणाल्या. एक ीकडे सत्तेत सहभागी असलेली शिवसेना सरकारवर कोणत्याही प्रकारे कठोर टीका करत असताना खा. सुप्रिया यांनी अप्रत्यक्षरित्या सरक ारची बाजू मांडणारी भूमिका घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने विविध महा विद्यालयात ‘युवा जागर संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत मंगळवारी(ता. 10) अंबाजोगाई  येथीलअभियांत्रिकी महाविद्यालयात युवा जागर संवाद कार्यक्रम झाला. त्यामध्ये खा. सुप्रिरा सुळे यांनि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी  महाराष्ट्रातील कायदा आणि सुवस्था तसेच पोलीस यंत्रणेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्‍नाबाबत त्या बोलत होत्या. एखादा पोलीस चूक असू  शकतो पण त्यामुळे यंत्रणेला दोष देता कामा नये असे त्या म्हणाल्या.