Breaking News

शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


श्रीगोंदा/प्रतिनिधी/- श्रीगोंदा तालुक्यातील शिवसेना मध्ये चालू असलेली अंतर्गत धुसफूस आता एकमेकाच्या पदावर येवून ठेपली. आता काहीची हका लपट्टी केली जात आहे. तर काहींनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. असे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही. 
श्रीगोंदा तालुक्यातील शिवसेनेत घनश्याम शेलार यांनी प्रवेश केल्यापासून जुन्या आणि नव्या शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणात वाद सुरु झाला आहे . त्यामध्ये पहिला बळी श्रीगोंदा शहराचे शहर अध्यक्ष संतोष खेतमाळीस यांचा गेला . त्यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर धुसफूस अजूनही वाढत राहिली आणि शेवटी जुन्या शिवसैनिकांनी एक मेळावा घेतला. 

आणि घनश्याम शेलार याचं निषेध व्यक्त केला. त्यानंतर युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब दुतारे याची हकालपट्टी करण्यात आली. हे पाहून हरीभावू काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संतोष खेतमाळीस बाळासाहेब दुतारे आणि हरी भावू काळे याच्या तालुक्यातील अनेक समर्थकांनी सामुहिक राजीनामे दिले. 

यामध्ये नाथा पवार, मयूर चव्हाण, अनिरुद्ध पावसे, संतोष चीखलठाणे, मयूर गोरे, संतोष केसकर, समीर काजी, ऋषिकेश हेंद्रे, सागर खेडकर, सुशांत काळे, अक्षय महाजन, अक्षय सरोदे, योगेश भूतकर, सोमनाथ धोत्रे, सागर लोखंडे, गणेश झेंडे, गणेश दुतारे, मावुली हेद्रे, जयराज गोरे, अजय भंडारी, विकास खेतमाळीस, सागर लोखंडे, या सर्व शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी राजीनामे दिले आहेत. 

राजीनामे देन्यामागे पक्षातील निष्टावंत कार्यकर्ते आहेत. आणि आता पक्षात कोणतीही निष्ठा राहिलेली नाही. म्हणून आम्ही आमच्या पक्षातील सर्व पदांचे राजीनामे देत आहोत.मात्र या राजीनामा सत्रामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शिवसेनेचे आस्तित्व धोक्यात आले आहे. असे सुजाण नागरिकांचे मत आहे