Breaking News

सोन्याच्या दरात मोठी घसरण

नवी दिल्ली :  सोन्याच्या मागणीत घट झाली असून या घटीमुळे सोन्याची किंमत घसरण झाली आहे. म्हणजेच सोन्याचा दर, 30,000 रुपयांपेक्षाही कमी झाला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 100 रुपयांनी घट झाल्याचं पहायला मिळालं. 


त्यामुळे सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमचा दर 30,000 रुपयांपेक्षाही कमी झाला आहे. आता 10 ग्रॅम सोन्याचा दर 29,650 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात घट होत असल्याचं पहायला मिळत आहे. बाजार विश्‍लेषकांच्या मते, स्थानिक बाजारात सोन्याची होणारी मागणी आणि कमी झाली आहे त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना मात्र, चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पहायला मिळालं. 

चांदीच्या दरात 200 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर 37,900 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीत 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात 100-100 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: 29,650 रुपये आणि 29,500 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात 500 रुपयांनी घट झाली आहे. तर, चांदीच्या दरात 200 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर 37,900 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.