Breaking News

नराधम बापानेच केला दोन वर्षांपासून मुलीवर बलात्कार

सातारा :-  तारळे परिसरात एक नराधम बापच स्वत:च्या मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून बलात्कार करत असल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत पीडित मुलीने तारळे पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिल्यानंतर उंब्रज पोलिसांनी नराधमावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील तारळे भागातील एका गावातील 48 वर्षीय नराधम गेल्या दोन वर्षांपासून स्वत:च्या 22 वर्षीय मुलीला शिवीगाळ, दमदाटी करून तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करत होता. 
या घटनेमुळे तारळे परिसरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. के. आवळे तपास करत आहे.