Breaking News

रोहितची पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाची अविस्मरणीय भेट !


एकदिवसीय प्रकारात तीन द्विशतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या रोहितच्या सुवर्ण कामगिरीला एक योगायोग जुळून आल्यामुळे आणखी झळाळी लाभली. रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका यांच्या लग्नाचा बुधवारी दुसरा वाढदिवस होता. त्यामुळे रोहितची ही अविस्मरणीय खेळी रितिकासाठी खास भेट ठरली. 

रोहित शर्माने द्विशतक झळकावल्यानंतर 'वेडिंग रिंग'च्या बोटाचे चुंबन घेऊन रितिकाला फ्लाईंग किसही दिला. या वेळी सर्व कॅमेरे रोहित शर्मा आणि रितिका यांच्यावर खिळले होते. त्यामुळे आता सोशल मीडियावर 'विरुष्का'नंतर रोहित आणि रितिका दोघेही चर्चेचा विषय ठरत आहेत. 

या सामन्यात रोहितने सुरुवातीला संयमी खेळी केली. मॅथ्यूजच्या पहिल्या षटकात त्याने एकही धाव घेतली नाही. मात्र त्यानंतर रोहितने धावांची अक्षरश: लयलूट केली.अखेरच्या काही षटकांमध्ये लंकेचे गोलंदाज रोहित शर्मासमोर पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसत होते.