Breaking News

बोलेरो गाडीत एकाचा होरपळून मृत्यूनागपूर :- राज्य मार्गावर झाडाला धडक दिल्याने शॉर्टसर्किट होऊन पेट घेतलेल्या बोलेरो गाडीत एकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, वर्धा-नागपूर राज्य मार्गावरून बोलेरो गाडी जात होती. केळझर (ता. सेलू) येथे आल्यानंतर चालकाला झोप अनावर झाल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट सामाजिक वनीकरणसमोर असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला धडकली. 


धडक इतकी जबर होती की, गाडीत शॉर्ट सर्किट झाले आणि गाडीने लगेचच पेट घेतला. चालकाच्या बाजूला बसलेली व्यक्ती गाडीतच फसली. वेळीच मदत न मिळाल्याने त्या व्यक्तीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने पळ काढल्याने वाहनात किती व्यक्ती होते.