Breaking News

वीरेंद्र म्हैसकर विरोधात ‘सीबीआय’कडून आरोपपत्र दाखल

वृत्तसंस्था - जमीन हडपल्याप्रकरणी आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे. वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह 12 जणांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी केली होती. 

द्रुतगती महामार्गानजीक असलेली सुमारे 1800 एकर जमीन हडपल्याप्रकरणी म्हैसकर यांच्याविरूद्ध 15 ऑक्टोबर 2009 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 10 जानेवारीला तक्रारदार सतीश शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अन्वेषण विभागाच्या आरोपपत्रात म्हैसकर यांचे नाव आरोपी समाविष्ठ करण्यात आले आहे.