Breaking News

भाजपबद्दल मी काय बोलू, भाजप तर आधीच कोकणातून हद्दपार !

गुहागर / दिनेश चव्हाण - भाजपबद्दल मी काय बोलू, भाजप तर आधीच कोकणातून हद्दपार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करतेवेळी स्वत: पाणी पितात व जनतेला सांगतात, मी तुम्हाला पाणी पाजतो, अशी आ. भास्कर जाधव यांनी खिल्ली उडवली. 


गेले अनेक दिवस गुहागर तालुक्यातील झोंबडी येथील राष्ट्रवादी व भाजपमधील चालू असलेल्या वादावर अखेर पडदा टाकून झोंबडी येथील बहुसंख्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी आ. भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, या सोहळ्यात ते बोलत होते. 

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनायक मुळे, विक्रांत जाधव, पद्माशेठ आरेकर, डॉ. प्रकाश शिर्के, लतिफ लालू, प्रवीण ओक, पूर्वा ओक, पूनम पाष्टे, दादा सकपाळ, इम्रान घारे, राजू मोहिते, अतुल लांजेकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष राकेश चाळके आदी उपस्थित होेते.