Breaking News

55 हजार रुपयांवर डल्ला मारणारा आरोपी 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत


औरंगाबाद, दि. 12, जानेवारी - 55 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी करणार्‍या आरोपीला न्यायालयाने 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांनी हे आदेश दिले.याप्रकरणी वाल्मिक दिलीप चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार,सहा ऑगस्ट रोजी फिर्यादीचे घर अस्ताव्यस्त झाले होते. यावेळी घरातील लोखंडी ग्रील तोडून 47 हजार रुपयांचे गंठण, मंगळसूत्र, एक हजारांचे पैंजण, दोन हजारांचा मोबाईल व रोख पाच हजार रुपये, असा 55 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.