Breaking News

भिवंडीत सेक्स रॅकेट चालविणार्‍या टोळीचा पर्दाफाश !


ठाणे : ठाणे पोलिसांच्या पथकाने भिवंडीत सेक्स रॅकेट चालविणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. भिवंडीतील संगमपाडा रहिवासी वस्तीतील चाळीमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घर मालकीण सुनिता ऊर्फ सीमा नाईक, दलाल महिला नाजिया आणि तिचा साथीदार राजेशम यांना अटक केली आहे. सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. संगमपाडा भागात सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयातील मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखाला मिळाली होती. यानंतर सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.