Breaking News

भीमा-कोरेगावचे नागपुरातही पडसाद, रिझर्व्ह बँक चौकात रास्ता रोको

नागपूर, दि. 03, डिसेंबर - भीमा कोरेगाव येथील घटनेचे आज, मंगळवारी नागपुरातही पडसाद उमटले. भीमा कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्याचा शहरातील रिझर्व्ह बँक चौक आ णि आनंद टॉकिज परिसरात निषेध करण्यात आला. यावेळी दलित कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

भीमा कोरेगाव येथील तणावाचा नागपुरातील कार्यकर्त्यांनाही मोठा फटका बसला. नागपूरमधून गेलेल्या काही दलित कार्यकर्त्यांच्या बसेस जाळल्याचे सांगत तरुणांनी या घटनेचा निषेध केलाभीमा कोरेगाव येथे दलित कार्यकर्त्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत आंबेडकरी नेते बोलत नाहीत, असे सांगत आज संविधान चौकात रामदास आठवले आणि सुलेखा कुंभारे यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी दलित कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करत रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली असून रिझर्व्ह बँक चौकात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान रात्री 8.30 वाजेच्या सुमाराला कामठी मार्गावरील कडबी चौक परिसरात काही समाजकंटकांनी बसची तोडफोड केली.