Breaking News

रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘कागर’

मुंबई : ‘सैराट’मधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचं सर्वांना कळलंच आहे. पण या चित्रपटाचं नाव काय हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. या चित्रपटाचं नाव ‘कागर’.



रिंकू आणि मकरंदच्या या नव्या चित्रपटाचं नाव आणि त्याचा फाँट नुकताच सोशल मीडियात लाँच करण्यात आला. या नावाच्या केलेल्या डिझाईनवरून चित्रपटाविषयी काही अंदाज व्यक्त करता येतात. ‘कागर’ या नावाचा फाँट हा बघताक्षणी ऍग्रेसिव्ह वाटतो. सध्या जगात या विचारसरणीचा जास्त प्रभाव वाहतो आहे. तसेच या डिझाईनमध्ये उधळलेला गुलाल हा कुतूहलतेचा प्रश्‍न आहे. या चित्रपटात रिंकूसह बाकी कलाकार कोण आहेत, याचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे. उदाहरणार्थ ‘निर्मित’चे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.