Breaking News

मालमत्ता करवाढी विरोधात राष्ट्रवादीचा नाशिक महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा

नाशिक, दि. 23, फेब्रुवारी - महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतल्याने नाशिककरांनी त्यांना भरभरुन दिले. यानंतर नाशिककरांनी स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहिले. मात्र इंधन - गॅस दरवाढ, नोटबंदी, जी. एस. टी., डबघाईस आलेला बांधकाम व्यावसाया यामुळे महागाईने होरपळलेल्या नाशिककरांवर मोठी करवाढ लादत बालकाच्या खिशावर पालकाने डल्ला मारला आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आज केला. दरम्यान मालमत्ता करवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने 27 फेब्रुवारी ते 3 मार्च यादरम्यान महापालिका विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉग्रेसकडून घेण्यात आला.


महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील राष्ट्रवादी कॉग्रेस गटनेता कार्यालयात आज गटनेते गजानन शेलार, यांच्यासह राकॉ. पदाधिकारी यांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी करवाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉग्रेसकडुन जोरदार टीका करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष ठाकरे म्हणाले, गेल्या चार वर्षात पेट्रोल व डिझेल दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली असून तर गॅसचा दर 375 रुपयांवरून 850 रुपये इतका झाला आहे. अशाप्रकारे सर्वसामान्यांची होरपळ सुरू असतानाच नोटबंदी व जीएसटीचे सर्वांना मोठ्या संकटात टाकले आहे. तर महापालिकेतील कारणांमुळे बांधकाम व्यववसाय धोक्यात आला असून गेल्या 5 वर्षात शहरात नवीन उद्योग आलेला नसल्याने मोठ्या प्रमाणात युवकात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. या एकूण महागाईच्या पार्श्‍वभूमीवर दत्तक नाशिककरांना पालक मुख्यमंत्र्यांकडून व महापालिकेकडून काही दिलासा मिळेल अशी अपेक्षा असतांनाच नाशिककरांवर तब्बल 33 टक्के निवासी करवाढ आणि व्यावसायिक व औद्योगिकमध्ये मजबुत करवाढ केल्याने नाशिककर कराचा बोजा टाकला आहे.
ही करवाढ करतांना इतर महापालिकेचे दाखले देण्यात आले असल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, राज्यातील मोठ्या व इतर महापालिकेतील नागरिकांचे दरडोई उत्पन्न व नाशिककरांचे दरडोई उत्पन्न याच्यातील तफावत सत्ताधा-यांनी लपून ठेवली. अशाप्रकारे सत्ताधा-यांकडुन स्मार्ट सिटीचा बाहु केला जात असला तरी त्या दिशेने मात्र कोणतेही ठळक काम अद्याप झालेले नाही. अशाप्रकारे नाशिककरांवर कराचा बोजा लादून आणखी संकटात टाकणा-या सत्ताधारी भाजपच्या निषेधार्थ आम्ही सहा विभागीय कार्यालयांवर हल्लाबोल मोर्चा क ाढणार आहे.
त्यानंतर शेवटी पुढील महिन्यात नाशिककरांचा सोबत घेऊन करवाढीच्या विरोधात भव्य मोर्चा राजीव गांधी भवना काढणार असल्याची माहिती ठाकरे यांनी शेवटी दिली. संपुर्ण ना शिककरांसह काढला जाणारा मोेर्चोची तारीख लवकरच कळविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.